0
Views

तात्काळ दुष्काळ जाहीर करा यासाठी
चटणी-भाकरी आंदोलन
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक
सोलापूर, दि. 21- शेतकऱ्यांसाठी तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई व एकरी एक लाख रुपये सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोमवारी कृषीमंत्री व इतर मंत्र्यांच्या विरोधात चार हुतात्मा पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता चटणी-भाकर खाऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी शेतातील करपून गेलेले सोयाबीन चौकामध्ये आणले होते. त्याचबरोबर सरकारला भेट म्हणून शेणाची टोपली सुद्धा आणली होती. शेतकरी आर्थिक संकटात असताना शासनाने ठोस निर्णय घ्यावा, पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. शेतकरी संकटात, मंत्री काजू-बदामात; दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना न्याय द्या सुकामेवा नाही शेण खावा अशा घोषणांद्वारे शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, प्रकाश व्यवहारे, तनवीर शेख, शाहू लामकानी, ज्ञानेश्वर भोसले, दिनकर माने, राहुल सावंत, तानाजी टोणपे, रोहण माने आदी उपस्थित होते.
दुष्काळाची घोषणा कधी होणार?
नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधिंनी काजू, बदाम खात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केल्याने शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यातच विरोधकांनी टिकेची झोड उठविल्याने सरकार आणि प्रशासन कात्रीत सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे काजू, बदामकडे राजकीय दृष्टीने बघू नका अशी सारवासारव करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून ते राज्यात दुष्काळाची घोषणा कधी करतात हे पाहणे महत्वाचे आहे.
















Leave a Reply