0
Views

हत्तीचे प्रातीनिधीक छायाचित्र
आजरा तालुक्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
कोल्हापूर, दि. 10- कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किटवडेपैकी धनगर वाडा येथे राजा टस्कर हत्तीने दिवसाढवळ्या धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उभ्या पिकात हत्ती घुसून पिकांची नासाडी करत आहे तर हत्तीच्या भीतीने मुलांनी शाळेला जाण्यापासून सुट्टी घेतली आहे.
बिथरलेला हा टस्कर हत्ती मोठ्याने चित्तकारत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इतर वेळी रात्री पिकांमध्ये घुसणारा हत्ती आता दिवसा ढवळ्याही धुडगूस घालत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. टस्कर हत्तीकडून भात, नाचणी, ऊस, केळी आदी पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाकडून हत्तीला हुसकावण्यासाठी फटाके फोडणे व सूरबाण लावण्या आले. मात्र याला न घाबरता हत्ती कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत असल्याने हे प्रयत्न उपयोगी पडलेले नाहीत. तर विद्यार्थी ये-जा करणाऱ्या वाटेवरच हत्ती येत असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेला सुट्टी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
















Leave a Reply