0
Views

पावसाअभावी युवा शेतकऱ्याने
सोयाबीन पिकावर फिरवला रोटावेटर
बार्शी, दि. 25- पावसाळा संपत आला तरी खरीपाच्या पिकाला पाण्याचा थेंब न मिळाली नाही. त्यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांकडून नैराश्यातून शेतात उभ्या पिकावर रोटावटर फिरवला जात आहे. गुराख्यांची जनावरे शेतात चरायला सोडण्याची बिकट वेळ आली आहे. कोरफळे (ता. बार्शी) येथील युवा शेतकरी दशरथ वांगदरे यांनी आपल्या दोन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर आज रोटावेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात 10-15 टक्के देखील पाऊस झाला नाही. पावसाभावी शेतकऱ्यांची खरीप पिकं डोळ्यादेखत जळून जात आहेत. ऐन गौरी-गणपतीच्या सणात नैराश्यातून शेतकरी खरीपाच्या पिकात जनावरे चरायला सोडत आहेत. अनेक शेतकरी पाण्याअभावी जळणारे सोयाबीन पिक रोटावेटरने रोटरून टाकत आहेत. कोरफळे (ता. बार्शी) येथील युवा शेतकरी दशरथ वांगदरे यांनी आपल्या दोन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर आज रोटावेटर फिरवला. मायबाप सरकारने तातडीने खरीपाच्या नुकसानीचे जलद पंचमाने करून मदत आणि सहाय्यता निधी मिळवून द्यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी करीत आहेत.
















Leave a Reply