बाळे येथे निर्मल गणेश मंडळाची स्थापना 


0
Views

बाळे येथे निर्मल गणेश मंडळाची स्थापना 

अध्यक्षपदी गुरव, मुजावर सचिव 

सोलापूर, दि. 20- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचलित ज. रा. चंडक प्रशाला, इंदिरा कन्या प्रशाला, शरद बालक मंदिर नर्सरी आणि राजीव प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात निर्मल गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ, सचिवा शिल्पा ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील शिक्षकांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात निर्मल गणेश मंडळ बाळेचे अध्यक्ष म्हणून दशरथ गुरव, उपाध्यक्ष म्हणून धनंजय देशमुख, सचिवपदी अब्दुलकादर मुजावर, खजिनदारपदी आशा ठोकळ, मिरवणूक प्रमुखपदी सारंग पाटील व अखिल शेख यांची तर सदस्य म्हणून भारती मुनोळी, नफीसा सय्यद, वैशाली खमितकर, श्रावण शिंदे, रूपाली फुलारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

 

उत्सवकाळात विविध उपक्रम राबविणार 

या गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांच्या लेझीम आणि विविध लोक परंपरातील नृत्य यांचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *