ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना  ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर


0
Views

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना 

‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

सोलापूर, दि. 19- गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत गजानन चव्हाण यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी याबाबतचे अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे. परिषदेच्या वतीने मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तंजावर (तामिळनाडू) येथे सरफोजीराजे द्वितीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच भव्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

चव्हाण यांनी केवळ पत्रकारिताच नव्हे तर सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी वेळोवेळी मदत केली आहे. तसेच मूळ गाव शिरापूर (ता. मोहोळ) येथे पाझर तलाव उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, बालाजी अमाईन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून गावासाठी सुसज्ज स्मशानभूमी उभारून दिली आहे. समाजहितासाठी केलेल्या या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *