0
Views

‘द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड 2026’साठी
शिवाचार्य महास्वामी, प्रा. बिराजदार यांची निवड
सोलापूर, दि. 18- शिक्षण, समाजसेवा, धार्मिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणाऱ्या ‘द ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड 2026’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भी. बहनमठ (वेळापूर) येथील श्री. ष.ब्र. 108 सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी आणि अक्कलकोट तालुक्यातील प्रा. गायत्री गौरीशंकर बिराजदार यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार सोहळा 20 ते 23 सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथील पेगासूस रीफ येथे होणार आहे.
सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांनी धार्मिक व आध्यात्मिक कार्याबरोबरच व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, गुरुकुल शिक्षण, शिष्यवृत्ती वाटप तसेच गरजूंसाठी अन्न-वस्त्रदान आणि विवाह सहाय्य यांसारख्या सामाजिक उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. गायत्री बिराजदार या गेली 16 वर्षांहून अधिक काळ ग्रामीण व सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, त्यांनी तब्बल 12 वर्षे विनामूल्य शिक्षणसेवा दिली आहे. विद्यार्थी सक्षमीकरण, महिला विकास, सामाजिक जागृती आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल यापूर्वीही त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बालाजी सरोवर, सोलापूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी, प्रा. गायत्री बिराजदार, उद्योगपती निसार शेख, डॉ. आप्पासाहेब उमदी आणि प्रा. गौरीशंकर बिराजदार उपस्थित होते. सोलापूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा हा गौरव प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
















Leave a Reply