कास पठार फुलांनी बहरले 


0
Views

कास पठार फुलांनी बहरले 

सातारा, दि. 17- जिल्ह्यातील पश्चिमेस असलेल्या जागतिक वारसास्थळ असलेल्या कासच्या पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटक मोठ्या संख्येने फुलांच्या पठाराला भेट देत आहेत.

 

 

पर्यटकांची संख्या सुट्टीच्या दिवशी म्हणजेच दर शनिवारी व रविवारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला फुलांसाठी वातावरण अतिशय पोषक असल्यामुळे पठार रंगी बेरंगी फुलांनी बहरू लागले आहे. पर्यटक परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासमवेत येत आहेत.

 

 

पठारावर सध्या बहुतांश ठिकाणी लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांचे लहान-मोठे गालीचे तयार झाले आहेत. तेरडा फुलांच्या गालिच्याला मोठ्या प्रमाणावर बहर आला असून कास पठारावर बहुतांश ठिकाणी लाल-गुलाबी रंगाची छटा मनाला मोहिनी घालत असल्याचे दिसून येते. तसेच पठारावर गेंद, सीतेची आसवे, सोनकी, अबोलीमा, कापरू, भुईचक्र यांसारखी अनेक फुले बहरली आहेत. फुलांना पाहून पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *