बापरे!!! ऊसाच्या फडात पकडली 11 फुटांची महाकाय मगर 


0
Views

बापरे!!! ऊसाच्या फडात पकडली 11 फुटांची महाकाय मगर 

देवणी तालुक्यातील बोरोळ गावातील घटना 

देवणी, दि. 16- लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोरोळ गावातील शेत शिवारात 11 फूट लांबीची महाकाय मगर यशस्वीरित्या पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

 

या घटनेची अधिक माहिती अशी की देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरोळ गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सोमनाथ उसाच्या शेतात मगर असल्याची माहिती सर्वत्र पसरली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती पोलीस आणि वन विभागाला मिळतात दोन्ही विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वन अधिकारी बोराडे यांनी स्थानिक सर्पमित्रांच्या साथीने अथक प्रयत्नातून या महाकाय मगरीला सायंकाळी साडेसहा वाजता सुरक्षितपणे पकडले. यासाठी मोठा दोरखंड, धान्याची पोती आदी साहित्याचा वापर करण्यात आला. या थरारक घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मगरीचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे वन अधिकारी बोराडे यांनी सांगितले. तसेच उसाच्या फडात ही महाकाय मगर नेमकी कुठून आली याबाबतची माहिती समजू शकली नाही. तर महाकाय मगर पकडली गेल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *