सर्वधर्मिय उत्सवांत ध्वनी प्रदूषण रोखण्याची ‘अंनिस’ची मागणी


0
Views

सर्वधर्मिय उत्सवांत ध्वनी प्रदूषण

रोखण्याची ‘अंनिस’ची मागणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना दिले निवेदन 

सोलापूर, दि. 16- सर्वधर्मिय सण आणि उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सण आणि उत्सवांदरम्यान ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, सोलापूर येथे सर्वधर्मीय सण-उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणावे, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या सोलापूर शहर शाखेने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

 

 

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरे करून सामाजिक सलोखा आणि आरोग्य जपले पाहिजे, अशी भूमिका अंनिस शाखेचे आर. डी. गायकवाड, व्हि. डी. गायकवाड, दीपक पांडगळे, निनाद शहा, सुजित हावळे, उषा शहा, शकुंतला सूर्यवंशी, सुनिता गायकवाड, अस्मिता बालगावकर यांनी यावेळी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *