न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज 


0
Views

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज 

सोलापूर, दि. 16- उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या अधिपत्याखालील सोलापूर शहर व तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज केले.

 

 

 

राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याने चारही न्यायालयीन कर्मचारी महासंघांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजा, ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

या आंदोलनात तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम राजेपांढरे, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष शकिल शेख, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष गणेश सोलनकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुकृत कुलकर्णी, प्रबंधक संजय म्याकलवार यांच्यासह शहर व तालुका न्यायालयांतील कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *