0
Views

महापौर कोंड्याल यांच्या निवासस्थानी
श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना
सोलापूर, दि. 14 – सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या जुनी मिल चाळ येथील निवासस्थानी आज श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोंड्याल कुटुंबीयांच्या निवासस्थानी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी रामकृष्ण कोंड्याल व संगीता कोंड्याल यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना, पूजन व आरती धार्मिक वातावरणात पार पडली. यावेळी कोंड्याल कुटुंबीयांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन शहरवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, धनश्री कोंड्याल, पृथ्वीराज कोंड्याल आणि वीरश्री कोंड्याल यांच्यासह कोंड्याल कुटुंबीय उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या आगमनाने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणरायाच्या चरणी सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
















Leave a Reply