पार्थिव गणेशमूर्ती स्थापन करा : काशी जगद्गुरू 


0
Views

पार्थिव गणेशमूर्ती स्थापन करा : काशी जगद्गुरू 

सोलापूर, दि. 13- सध्याला वाढते जल प्रदूषण, अपुरे जलस्रोत यामुळे यंदाच्या वर्षीपासून पार्थिव गणेश म्हणजे मातीच्या गणेश मूर्ती सगळीकडे स्थापन कराव्यात, असे आवाहन श्री काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आज रविवारी सोलापुरात केले.

 

 

सोलापुरात एका धार्मिक अनुष्ठान वेळी ते आले होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे विचार मांडले. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन करणे गरजेचे असते. ते पाण्यामध्येच करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नाही ते पाण्यातही विसर्जन करता येते. म्हणून पाण्याच्या टाकीमध्ये, तलाव किंवा घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. पीओपी किंवा पाण्यात न विरघळणारी मूर्ती नसावी. मातीची किंवा शाडूची लहान मूर्ती आणून त्याची स्थापना करून पूजन करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल. पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्रीगणेश मूर्ती पुन: घरामध्ये ठेवता येते. हिंदू धर्म शास्त्रात गणेशाला खूप मान आहे. ती आदी आणि बुद्धी देवता आहे. त्याचे आगमन सर्वाना शुभ फळ देवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *