एक्सपर्ट टॉक उपक्रमांतर्गत सर्पमित्रांचे मार्गदर्शन


0
Views

एक्सपर्ट टॉक उपक्रमांतर्गत सर्पमित्रांचे मार्गदर्शन

सोलापूर, दि. 7- पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोलीकाटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे पीएमश्री एक्सपर्ट टॉक या उपक्रमांतर्गत सर्परक्षक अजित चौहान व संतोष धाकपाडे यांचे प्रबोधनपर व्याख्यान व माहितीसत्र आयोजित करण्यात आले होते.

 

या व्याख्यानात बिनविषारी वाळा, कवड्या, गवत्या, कुकरी, डुरक्या घोणस, धूळनागिन, अजगर, तस्कर, मांडूळ, धामण तर विषारीमध्ये नाग, मण्यार, फुरसे, घोणस या वेगवेगळ्या सापांच्या प्रजातीची माहिती दिली. साप ओळखण्याची चिन्हे, सापांची वैशिष्ट्ये, सापाविषयी असणारे समज-गैरसमज याविषयी सविस्तर विवेचन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बत्तीस शिराळा, किंग कोब्रा व धामण सापाविषयी असणारे काही समज यावर प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना तज्ञाकडून सोप्या भाषेत उत्तरे देण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ह. न. पाटील हे होते. या उपक्रमाचे आयोजन सुधीर येनकीकर यांनी केले होते. यावेळी कल्पना धमुरे, मनोज ठोंबरे, रोहिणी गांधी, दिनकर चव्हाण, गंगाबाई गंधुरे, सुनीता पवार, चारुशीला नकाते, शुभांगी सोनवणे, दीपक गावडे, पवित्रा मदने, बापूराव यजगर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार वसंतपुरे यांनी केले तर राजन ढवण यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *