0
Views

सिद्धेश्वरांच्या मूर्तीस घातला 15 किलो राजगिरा लाडूचा हार
मंद्रूपमधील तरुणांनी घेतला पुढाकार
सोलापूर, दि. 7- श्रावणसोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मूर्तीस घालण्यात आलेला राजगीरा लाडूचा हार मंद्रूप येथील माळी गल्लीतील तरुणांनी तयार केला आहे. यासाठी १५ किलो राजगीरा लाडूचा वापर करण्यात आला आहे.
हा भला मोठा हार तयार करण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागला आहे. संतोष नंदुरे या कालाकाराची ही मूळ संकल्पना आहे. त्याला या कामासाठी मंद्रूपच्या आकाश हेळकर, विनायक ख्याडे, संतोष जकुणे, राजू उमदी, मल्लिकार्जून अडोळे यांचे सहकार्य लाभले आहे. सिद्धेश्वर महाराज यांच्यावरील श्रद्धेपोटी तरुणांनी हा उपक्रम राबविला आहे. तरुणांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
















Leave a Reply