देगाव, पंढरपूर येथे वरूणराजाचे आगमन 


0
Views

देगाव, पंढरपूर येथे वरूणराजाचे आगमन 

सोलापूर, दि. 6- उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव परिसरात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. तर पंढरपूर शहरात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाऊस पडल्याने भाविकांचे हाल झाले.

 

गेल्या दोन महिन्यांपासून सुट्टीवर गेलेल्या वरूणराजाचे आज रविवारी आगमन झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. हा पाऊस दहा ते वीस मिनिटे पडला. यामुळे परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडाली.

 

वास्तविकपणे राज्यासह देशात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह कृषीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर चिंतेचे ढग आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अल्प पाऊस झाल्याने उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. तर वावरात पिकच नसल्याने कृषीवर अवलंबून असलेल्या बाजारपेठांची आर्थिक घडी विस्कटली आहे. खते, औषधे, बी बियाणे यांची विक्रीच न झाल्याने अनेक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *