आंध्र प्रदेश मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. काळे यांचा सत्कार


0
Views

आंध्र प्रदेश मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष

डॉ. काळे यांचा सत्कार 

सोलापूर, दि. 3- मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य आंध्र प्रदेशचे मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व शिवजन्मोत्सव पहिल्यांदा आंध्रप्रदेश मध्ये साजरा केला ते डॉ. सागर काळे हे सोलापुरात आल्यानंतर त्यांनी मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

 

यावेळी डॉ. काळे यांनी बाळीवेस येथील सिद्धनाथ ऑप्टिकल मध्ये सर्वांची भेट घेतली. यावेळी त्यांचा मराठा सेवा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी राम गायकवाड यांची आठ राज्याच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. काळे यांनी सर्वांशी चर्चा केली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, शहर उपाध्यक्ष रमेश जाधव, सचिव प्रा. लक्ष्मण महाडिक, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, वधु वर कक्षाचे शहराध्यक्ष राम माने, शिवाचार्य गोवर्धन गुंड, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *