0
Views

पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात उंदरांचा उपद्रव
पुरी, दि. 2- ओडिशा राज्यातील पुरी येथील समुद्राजवळ असलेल्या प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिरात सध्या उंदीर आणि झुरळांनी उच्छाद मांडल्याने मंदिर प्रशासनापुढे त्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
फुले आणि वस्त्रांवर ताव
ही उंदरे आणि झुरळे मंदिरातील गर्भगृहात देवतांना भाविकांकडून अर्पण केलेली फुले खात आहेत. तसेच देवतांची मौल्यवान वस्त्रे कुररतडत आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र मंदिरात कोणत्याही प्राण्याला किंवा किटकाला मारू नये अशा सूचना असल्याने यांचा बंदोबस्त कसा करायचा हा प्रश्न मंदिर प्रशासनापुढे पडला आहे. त्यामुळे उंदरांना विष घालून मारण्याची परवानगी नसल्याने त्यांना जिवंत पकडून मंदिराबाहेर सोडले जाणार आहे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. याची जबाबदारी विशिष्ट सेवकांवर सोपविण्याची तरतूद मंदिराच्या नोंदवहीमध्ये करण्यात आली आहे. तर झुरळांना आकर्षित करून जिवंत पकडण्यासाठी गाभाऱ्यात गुळ आणि इतर चिकट पदार्थ लावलेली भांडी ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी 2023 साली उंदरांचा असाच उपद्रव वाढला होता. त्यावेळी मंदिर प्रशासनाकडून अशाच प्रकारच्या पारंपरिक उपायांचा वापर केला गेला होता. मंदिर प्रशासनाला हा उपद्रव कमी करण्यासाठी आता पुन्हा तीच शक्कल लढवावी लागणार आहे.
















Leave a Reply