संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सीईओ यांना निवेदन


0
Views

 

सोलापूर, दि. 26-

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी अविनाश गोडसे यांची बदली केल्याने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, कुशल सीईओ जैन यांना संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने बदली रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, मराठा सेवा संघ शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, लिंबराज जाधव, राजू व्यवहारे, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, राजेंद्र भोसले, संतोष माने जिवन यादव, मल्लिकार्जुन, शेखर भोसले, दास व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *