0
Views

वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर
संस्थेतर्फे पुरस्कारांचे वितरण
सोलापूर, दि. 4- वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर संस्थेतर्फे आज रविवारी सकाळी १० वा. बायो सोलापूर पर्यावरण जागर २०२६ या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणप्रेमींचा सन्मान सोहळा व जैवविविधता या विषयावर माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गोपाबाई दमाणी ब्लड बँक हॉल, सोलापूर या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरणप्रेमी उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर या उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक निनाद शहा, अरविंद कुंभार, नरेंद्र गायकवाड, सिद्राम पुराणिक, बी. व्ही. शहा इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वडाच्या झाडाला पाणी घालून करण्यात आली.
यानंतर वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर संस्थेतर्फे पर्यावरणप्रेमी श्रीकांत बडवे, कल्याणराव साळुंके, परशुराम लांबतुरे, श्रीकांत कदम, समाधान वाघमोडे, महेश पांढरे, प्रकाश सनपूरकर, सुलोचना बसवेश्वर, पूजा सावंत, दीपक इंगळे, रेस्क्युअर कृष्णा निरवणे व प्रविण जेऊरे यांचा उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व उपस्थित मान्यरांच्या हस्ते बायो सोलापूर गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व वृक्षाचे रोप असे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक निनाद शहा व डॉ. अरविंद कुंभार यांनी उपस्थित पर्यावरणप्रेमीना निसर्गातील आपले अनुभव कथन केले.
यानंतर आयोजित माहितीसत्रामध्ये गार्गी गिध यांनी “बीयाँड द कॉनफ्लीक्ट व ओहोटी’ या विषयावर लघुपट सादर केला. यानंतर या विषयावर उपस्थित पर्यावरणप्रेमींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर प्रसाद बोलदे यांचे “सोलापूरची जैवविविधता व संरक्षित क्षेत्राबाहेरील त्यांचे संरक्षण” या विषयावर पिपिटीसहित मार्गदर्शन लाभले. दोन्ही माहितीपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित पर्यावरण प्रेमींनी दाद दिली.
या कार्यक्रमास शिवानंद हिरेमठ, शिवानी गोटे, साक्षी हिरेमठ,प्रवीण गावडे, विनय गोटे, सूरज धाकपाडे, शुभम बाबानागरे, शिरीष गोळवणकर अजय हिरेमठ, सिद्धेश्वर मिसालेल्लू, औदुंबर गेजगे, शैलेश स्वामी, विक्रमसिंह बायस, महेश कासट इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कबाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित कोठारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी सोलापूर प्लेट बँक, कोठारी एंटरपाईजेस अजित कोठारी, प्रणोती कोठारी आणि भकालो नर्सरीचे मालक सोम पाटील, रुकेश कांबळे यांचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक अजित चौहान, संतोष धाकपाडे, अजित कोठारी, सोमशेखर पाटील यांनी परिश्रम घेतले.















Leave a Reply