0
Views

प्रवीणदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त
आधार वृद्धाश्रमात फळांचे वाटप
सोलापूर, दि. 2- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने अक्कलकोट रोडवरील आधार वृद्धाश्रमातील निराश्रित वृद्धांना फळांचे वाटप करून त्यांच्यासोबत वेळ घालविण्यात आला.
यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजू व निराश्रित वृद्धांची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमास संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नमिनल दास, शहर अध्यक्ष सुनीता घंटे, दक्षिण तालुका प्रमुख जैनुद्दीन नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते. वृद्धाश्रमातील व्यवस्थापनाने संभाजी ब्रिगेडच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.















Leave a Reply