झेडपी सीईओंच्या दालनात कचरा फेकण्याचा प्रयत्न


0
Views

झेडपी सीईओंच्या दालनात कचरा फेकण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

सोलापूर, दि. 18- ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सोलापूर शहरात नेहरू हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनात कचरा फेकण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यशस्वी चर्चा झाली.

 

या चर्चेदरम्यान नेहरू हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यावर सीईओंनी नेहरू हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आणि पुढच्या आठवड्यात टेंडर वर सही करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागचे खैराती यांना दिले

 

विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि इतर प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, योगेश घोडके, रोहीत कोकरे, सिध्दाराम फुलारी, महेश हिपळे, सिध्दाराम गुरव, प्रकाश माळी, सुजल कोळी, शहर सचिव अक्षय कांबळे, कुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *