ठोकळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त निर्मल मॅरेथॉन स्पर्धा 2026 


0
Views

ठोकळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त

निर्मल मॅरेथॉन स्पर्धा 2026 

सोलापूर, दि. 18- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे व इंदिरा ज्ञानवर्धनि शिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मल मॅरेथॉन स्पर्धा-2026 चे आयोजन करण्यात आले होते.

 

कै. निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मेकॅनिक चौकातील स्व. स्वा.से. तुळशीदास दादा जाधव यांच्या पुतळ्यापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा आंतरशालेय 14 वर्षे वयोगट मुले- मुली व 17 वर्षे वयोगट मुले -मुली या दोन गटांमध्ये घेण्यात आली.

 

 

या स्पर्धेमध्ये ज.रा. चंडक प्रशाला बाळे, जिजामाता प्रशाला कोंडी, इंदिरा प्रशाला बाळे, निर्माते ठोकळ प्रशाला इंदिरानगर, छत्रपती शिवाजी प्रशाला , संभाजीराव शिंदे प्रशाला, हरिभाई देवकरण प्रशाला, दमाणी प्रशाला, महेश इंग्लिश स्कूल, गांधीनाथा प्रशाला, सरस्वती प्रशाला सोलापूर इत्यादी प्रशालेचे 500 हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

 

या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ, इंदिरा ज्ञानवर्धनेचे अध्यक्ष विपिन ठोकळ, डॉ. हिरेमठ, क्रीडअधिकारी नजीर शेख, सचिवा शिल्पा ठोकळ, संचालक दत्तात्रय गाजरे, ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव राजू प्याटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मोहनराव घोडके, मुख्याध्यापक उदय जाधव, सोलापूर शहर- जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून ॲथलेटिक असोसिएशनचे सदस्य श्रीरंग खांडेकर, प्रकाश गायकवाड, शिवानंद मैंदर्गी ,सुनील चव्हाण, भारतीय लिंगडे, प्रा. प्रमोद चुंगे, सचिन गाडेकर, उज्वल मलजी, राजाराम शितोळे, मारुती घोडके, वीरेश अंगडी, शिवानंद सुतार, ज.रा.चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज बाळे ,श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला, इंदिरा प्रशाला बाळे, जिजामाता प्रशाला कोंडी, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

 

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

14 वर्ष मुले –1)श्रीधर डोंगरीतोड, 2)सौरभ सातपुते, 3)सनी कोळी. 14 वर्षे मुली-1) जानवी हरिहर, 2)श्रीदेवी कुंडुर, 3)सुहानी साळुंखे, 4)आरोही सरवदे. 17 वर्ष मुले –1)दीपक किपोळे, 2)काशिनाथ चव्हाण, 3)विजय आंबेवाले. 17 वर्षे मुली – 1)सृष्टी हडपद, 2)पवित्र नागलगाव, 3)अक्षता गनगोंडा. विजयी खेळाडूंना प्रथम क्रमांक 2001 रुपये , द्वितीय क्रमांक 1501, तृतीय क्रमांक 1001 रुपये प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *