0
Views
सोलापूर टेनिक्वाईट असोसिएशनची
शनिवारी निवड चाचणी स्पर्धा
सोलापूर, दि. 17- सोलापूर मनपा टेनिक्वाईट ( रिंगटेनिस) असोसिएशन सोलापूर यांच्यावतीने टेनिक्वाईट ज्युनियर मुले व मुली शहर निवड चाचणी स्पर्धा शनिवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी राजीव गांधी इनडोअर हॉल सात रस्ता येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्डची झेरॉक्स व आवश्यक साहित्यसह मैदानावर उपस्थित राहावे. खेळाडूची जन्मतारीख 1/1/2008 नंतरची असावी. या निवड चाचणी स्पर्धेतून निवडलेला संघ दिनांक 2 ते 4 ऑक्टोंबर 2026 रोजी निगडी (पिंपरी चिंचवड शहर) येथील सौ मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल यमुना नगर सेक्टर 21 निगडी पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल.
खेळाडूंनी मैदानावर संघटनेचे स्पर्धाप्रमुख सुहास छंचुरे, 9028075151 अजित पाटील 9881009257 यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान शहर संघटनेचे अध्यक्ष मनिष सुरवसे, सचिव भीमराव बाळगे, कोषाध्यक्ष इक्बाल शेख यांनी केले आहे.












Leave a Reply