0
Views

मस्कले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेत
खुल्या गटात बार्शीचा शंकर साळुंके अजिंक्य
सोलापूर, दि. 16- ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने “स्व. शंकर शिवप्पा मस्कले स्मृती चषक” यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकीत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बार्शीचा शंकर साळुंके याने स्पर्धेत आठ पैकी आठ गुण प्राप्त करत तर महिला गटात धाराशिवच्या हर्षिता भोसले हिने साडेसहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. खुल्या गटात मानांकित पार्थ वलेकर, बार्शीचा मानांकित यशवंत उबाळे, आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी तसेच बार्शीचा प्रसन्न जगदाळे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चौथा क्रमांक पटकाविला. १६ वर्षाखालील गटात जय तुम्मा, १२ वर्षाखालील गटात नैतिक होटकर व ८ वर्षाखालील गटात नियान कंदीकटला यांनी उत्कृष्ट खेळ करत जेतेपद प्राप्त केले. तर जेष्ठ खेळाडूत ६५ वर्षीय धाराशिवच्या नंदकुमार सुरु यांनी बाजी मारत अव्वल स्थान मिळविले.
ईरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेच्या प्रायोजीका कस्तुरबाई शंकर मस्कले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नामवंत उद्योजक द्वारकाप्रसाद उपलप, संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे सचिव गणेश मस्कले, राष्ट्रीय खेळाडू रोहित पवार, चंद्रशेखर कोरवी, विद्या मस्कले, सरस्वती झंपले, राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणात मस्कले यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत, खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पाटील यांनी मानले. विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे, आकर्षक चषक व मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून युवराज पोगुल, प्रशांत पिसे, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, गौरव माने, अभिषेक राठोड आदींनी यशस्वीरीत्या काम पहिले.
अंतिम निकाल खालीलप्रमाणे (अनुक्रमे १ ते १० गुण व बोकोल्स गुणांसह):
खुला गट: शंकर साळुंखे-८, पार्थ वलेकर-७(४१.५), यशवंत उबाळे – ७(३८.५), पवन राठी- ६.५(३७), प्रसन्ना जगदाळे-६.५(३६.५), साईराज घोडके-६.५(३३.५), मल्हार वाघे-६(३८), वेद आगरकर-६(३७), साईराज पाटील-६(३४.५), शार्विल डांगे-६(३१.५)
महिला: हर्षिता भोसले-६.५, संजीवनी चव्हाण-६(३७), सृष्टी तोंडले-६(२८.५), श्रेया संदूपटला-५.५, श्रावणी देवनपल्ली-५(३३), फराळ शेख-५(३१.५), आर्वी सदाफुले-५(२८), स्वराली हातवळणे-४.५(४१), उत्कर्ष लोखंडे-४.५(३६), अक्षरा जाधव-४.५(३४.५)
१६ वर्षे: जय तुम्मा-६.५(४०), वेदांत मुसळे-६.५(३५), साद सय्यद-६(४०.५), नचिकेत तोंडले-६(३१), नागेश राजमाने-५.५(३९.५), पर्व अग्रवाल-५.५(३५.५), रोहन थोरात-५.५(३५), वेदांत पवार-५.५(३२), थेमजान होरम-५(३५.५), हाऊकिप गिंखोहाओ-५(३३)
१२ वर्षे: नैतिक होटकर-६(३८.५), माने देशमुख आर्यन-६(३७), प्रतीक हलमल्ली-६(३६.५), वेदांत पांडेकर-५.५(३२.५), प्रणव मजगे-५.५(३०.५), मयूर स्वामी-५(३५.५), हिमांशू व्हनगावडे-५(३५), श्लोक चौधरी-५(३४), श्लोक सदाफुले-५(३३.५), हार्दिक रजपूत-५(३२)
८ वर्षे: नियान कंदीकटला -५.५,कृष्णराज पाताले-५(३५),आयुष बदवने-५(२९), आरुष माने -४.५,ऋषभ पामनानी-४(३४.५),माने देशमुख धनराज-४(३३),ईशा पटवर्धन-४(३०),मिथिलेश होर्टीकर- ४(२८),जय राठी-४(२८),स्वरांजली जाधव-४(२६.५)
उत्तेजनार्थ: दुर्व पोळ, अद्विक कुर्डे, वाग्मी भद्रे, आवेश तोलनूर, अवनी कत्ते, अधिरा म्हेत्रे, संस्कृती लव्हाळे, प्रिया पवार, स्वप्निल इंगळे.













Leave a Reply