स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन 


0
Views

स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक

बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन 

सोलापूर, दि. 13- ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने “स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक” यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ बुद्धिबळ स्पर्धेत ३२ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह माळशिरस, पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा आदी तालुक्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील १७८ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

 

 

या स्पर्धेचे उद्घाटन प्रायोजीका कस्तुराबाई शंकर मस्‍कले व नामवंत उद्योजक द्वारकादास उपलप यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने करण्यात आले. यावेळी ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे अध्यक्ष सरस्वती झंपले, जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे सचिव गणेश मस्कले, ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे विद्या मस्कले, राष्ट्रीय पंच संतोष पाटील तसेच सर्व पदाधिकारी, पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात सचिव गणेश मस्कले यांनी दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे जाहीर करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुमुख गायकवाड यांनी केले.

 

 

 

सात रस्ता येथील इरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे रंगलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू बार्शीचा शंकर साळुंके, पार्थ वलेकर, पवन राठी, नागेश राजमाने, नाचिकेत तोंडले, नंदकुमार सुरु, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसरगीकर, स्वराली हातवळणे या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंनी विजयी सलामी दिली. तसेच बिगरमानांकित सय्यद साद, मानांकित यशवंत उबाळे, मल्हार वाघे, श्रेया संदुपाटला यांनी आकर्षक विजय मिळवीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर सहाय्यक म्हणून युवराज पोगुल, विजय पंगुडवाले, प्रशांत पिसे, प्रज्वल कोरे, गौरव माने, अभिषेक राठोड आदी काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *