0
Views

कॅन्सरग्रस्त खो खो पंच लखन कांबळे यांना
कास्ट्राईब संघटनेच्या वतीने दीड लाखांचा धनादेश सुपूर्द
सांगोला, दि. 11- येथील प्राथमिक शिक्षक व राष्ट्रीय खो खो पंच लखन कांबळे हे मागील तीन महिन्यापासून कॅन्सर या आजाराने त्रस्त असून, उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, खो खो संघटनेचे खजिनदार श्रीरंग बनसोडे यांनी पुढाकार घेऊन लखन कांबळे यांना एक लाख पन्नास हजार रुपयाचा धनादेश, उत्तर सोलापूरचे गटशिक्षण अधिकारी अवचील महाडिक यांच्या हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, शहर प्रमुख पवन कांबळे, दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष श्रीरंग बनसोडे, सचिव बाबुराव गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण बनसोडे, बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे आदी उपस्थित होते.














Leave a Reply