सिंहगड महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाची संशोधनात नवी नोंद


0
Views

सिंहगड महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स

विभागाची संशोधनात नवी नोंद

सोलापूर, दि. 11- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाने अभिमानास्पद कामगिरी नोंदविली आहे. विभागातील चार विद्यार्थ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयांतर्गत डिझाईन रजिस्ट्रेशन क्रमांक 475851-001 प्राप्त झाले असून, विभागाचे हे पहिले डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र ठरले आहे.

 

 

 

 

कॉम्प्युटर सायन्स विभागातील अक्षय बापू इंगळे, समर्थ सतीश चव्हाण, अथर्व शिवानंद चौधरी आणि प्रतीक दत्ता कांबळे या विद्यार्थ्यांनी Natural Language Processing Device for Identifying Conversational Context या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर संशोधन केले. या संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रा. विनायक पालमूर आणि प्रा‌. अम्रपाली गुंड यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख प्रा. हरीश टी. गुरमे यांनीही या संशोधनासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

 

 

 

 

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक आणि विभागप्रमुखांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

 

 

 

 

विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र महाविद्यालयातील संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळालेली महत्त्वपूर्ण दाद असून, भविष्यातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

 

 

 

 

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, विभागप्रमुख प्रा. हरीश टी. गुरमे, मार्गदर्शक आणि महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

 

 

 

संभाषणाचा संदर्भ ओळखण्यासाठी तंत्रज्ञान

‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ अर्थात मानवी भाषेचे संगणकीय विश्लेषण या क्षेत्राशी संबंधित या संशोधनामध्ये संभाषणातील संदर्भ ओळखण्यासाठी उपकरणाची संकल्पना मांडण्यात आली आहे. मानवी संवाद अधिक प्रभावीपणे समजून घेणे, संभाषणातील संदर्भ ओळखणे आणि त्यावर आधारित संगणकीय प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या संशोधनाला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत संशोधन व नवोपक्रमाची जोड देत हे यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *