सिटीझन उर्दू हायस्कुल येथे सर्पज्ञान व जनजागृती या विषयावर मार्गदर्शन


0
Views

सिटीझन उर्दू हायस्कुल येथे सर्पज्ञान व जनजागृती या विषयावर मार्गदर्शन

सोलापूर, दि. 9- सिटीजन उर्दू हायस्कूल सोलापूर येथे वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर तर्फे सर्परक्षक अजित चौहान व संतोष धाकपाडे यांचे सर्पज्ञान व जनजागृती या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन व माहितीसत्र आयोजित करण्यात आले होते.

 

 

या माहितीसत्रात सोलापुरात आढळणाऱ्या विविध बिनविषारी निमविषारी व विषारी सापांची पोस्टरद्वारे ओळख व माहिती देण्यात आली. यामध्ये बिनविषारी वाळा, कवड्या, गवत्या, कुकरी, डुरक्या घोणस,धूळनागिन, अजगर, तस्कर, मांडूळ, धामण तर विषारीमध्ये नाग, मण्यार, फुरसे, घोणस या वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. साप ओळखण्याची चिन्हे, सापांची वैशिष्ट्ये, सापाविषयी असणारे समज-गैरसमज याविषयी सविस्तर विवेचन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सापाविषयी असणारे काही समज-गैरसमज यावर प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना तज्ञाकडून सोप्या भाषेत उत्तरे देण्यात आली.

 

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मजहर शहापुरे हे होते. सूत्रसंचालन जावेद चांदा यांनी केले. यावेळी डब्ल्यू सी ए चे प्रवीण गावडे व शाळेच्या शिक्षिका रईसा शेख, फौजीया वस्ताद व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *