स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन


0
Views

स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक

बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

सोलापूर, दि. 9- ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने “स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक यांच्या स्मरणार्थ खुली, १६, १२ व ८ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता इरण्णा उपलप मंगल कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात आले आहे.

 

 

 

ही स्पर्धा फिडेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ७ फेऱ्यात संपन्न होणार असुन खेळाडूंना प्रत्येकी १० मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे.

 

 

 

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एकूण २५००० रुपया पर्यंतची रोख बक्षिसे, मेडल व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार असुन स्पर्धेत एकूण ६३ पारितोषिके देण्यात येणार असल्याबाबतची माहिती ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे अध्यक्ष सरस्वती झंपले व सचिव गणेश मस्कले यांनी दिली आहे.

 

 

 

स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. २०० ठेवण्यात आलेली असून इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे (मो.क्र. ८८८८०४५३४४) व प्रज्वल कोरे (मो.क्र. ८८३०६२२२२१) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, आकाश गायकवाड, विद्या मस्कले, शकुंतला माने, संतोष पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *