सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा 


0
Views

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा 

सोलापूर, दि. 6- सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे, नृत्य, गीत, कविता व मनोगते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचा अनुभव घेतला.

 

यावेळी मार्गदर्शन करताना संजय नवले म्हणाले, “शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्कार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करून त्यांच्या मार्गदर्शनाचा जीवनात सकारात्मक उपयोग करावा.”

 

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनीही नवनवीन ज्ञान आत्मसात करत राहणे आवश्यक असल्याचे सांगून नवले यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, शिक्षणासोबत संस्कार, मूल्ये, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील स्नेह आणि आदर अधिक दृढ करणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी शाळेच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *