0
Views

संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिला दहीहंडी उत्साहात साजरी
सोलापूर, दि. 6- संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित महिला दहीहंडी उत्सव जुळे सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी महिला गोविंदा पथकांनी तीन थर रचून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली. दहीहंडी फोडण्याचा मान साक्षी ठेंगील हिने मिळवला. विजेतीला संभाजी ब्रिगेडच्या वतीने मानाची ट्रॉफी यावेळी प्रदान करण्यात आली.
राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी जुळे सोलापूर पोलीस चौकीच्या पीआय मोरे पाटील, नगरसेवक प्रियदर्शन साठे हे उपस्थित होते.
यावेळी खासदार ज्योती वाघमारे यांनी संभाजी ब्रिगेडने महिलांना पुरुषाच्या बरोबर समान संधी देण्याचे काम केले आहे. कारण सगळीकडे गोविंदा दहीहंडी फोडतात पण जुळे सोलापूरची संभाजी ब्रिगेडची दहीहंडी या गोपिका फोडत आहेत याचा नक्कीच अभिमान आहे, असे मनोगत व्यक्त केले.
महिलांना सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या नेतृत्वगुणांना व्यासपीठ मिळावे आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या विशेष महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापुरातील प्रांजल पवार आणि अविनाश रस्ते यांच्या नेतृत्वाखालील शिवज्ञा ढोल-ताशांचा गजर ने व महिलांचा उत्साह आणि उपस्थित नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते .
यावेळी या दहीहंडीचे आयोजक संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, रील स्टार प्रीती वराडे, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, महिला शहराध्यक्ष सुनीता घंटे, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष प्रीती कदम, मुक्ता चव्हाण, निता आकुडे, संपदा जोशी, सुरेखा येवले, सामाजिक कार्यकर्ते महेश आठवले, अक्षय कांबळे, रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, ओंकार कदम, गजानन शिंदे, वैभव गंभीरे आदींसह बहुसंख्याने महिला उपस्थित होत्या.















Leave a Reply