0
Views

दयानंद महाविद्यालयात बी. एड. प्रशिक्षणार्थी
विद्यार्थ्यांसाठी सर्पज्ञान व जनजागृती माहितीसत्र
सोलापूर, दि. 5- डी पी बी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर या संस्थेच्या वतीने बी. एड. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी सर्पज्ञान व जनजागृती माहितीसत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. पी. आर. भोजे यांनी वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष अजित चौहान यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला. तर प्रा. डॉ. के. जे. शिंदे यांनी शिवानंद हिरेमठ यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला. तसेच संतोष धाकपाडे व तुषार राठोड यांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतर शिवानंद हिरेमठ यांनी यांनी सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध प्रजातीच्या विषारी सापांची पोस्टरच्या सहाय्याने माहिती दिली. तर अजित चौहान यांनी बिनविषारी सापांच्या प्रजाती, श्रद्धा-अंधश्रद्धा तसेच शेतकऱ्यांना सापापासून होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष धाकपाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनात सापाबद्दल असलेल्या शंका कुशंकांचे निरसन केले.
बी. एड. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. पी. आर. भोजे म्हणाल्या की, या सर्पज्ञान व जनजागृती माहिती सत्राचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात अध्यापन क्षेत्रात निश्चितच होईल. या माहितीपूर्ण सत्राचे सूत्रसंचालन पल्लवी निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋषिकेश धोत्रे यांनी केले.
सापांचे मार्गदर्शन झाल्यानंतर उपस्थित प्राध्यापक, सर्व सदस्य व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सर्प संरक्षण व संवर्धनाची शपथ घेतली.















Leave a Reply