0
Views

रुक्माई स्पोर्ट्स क्लबकडून खो-खो खेळाडूंचा विशेष सत्कार
सोलापूर, दि. 3 –
मुंबई येथे नुकत्याच ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खो-खोच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एसएनडीटी विद्यापीठाने सहभाग नोंदवून एसएनडीटी विद्यापीठाला सिल्वर मेडल जिंकून दिले.
या विद्यापीठाच्या संघामध्ये रुक्माई स्पोर्ट क्लबचे अर्चना व्हनमाने, सृष्टी रुपनवर, सपना बंडे, गौरी कासवीद या खेळाडूंची निवड झाली होती. या स्पर्धेत या चारही रुक्माईच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याबद्दल या चारही खेळाडूंचा रुक्माई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जागृती प्रशालेचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण, मागास समाजसेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष विवेक चव्हाण, जय जवान जय किसान सैनिकी शाळेचे प्राचार्य रवींद्र चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक सदानंद गुजले, महेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, जितेश चव्हाण, क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.













Leave a Reply