0
Views

मेरी ज़िंदगी का सबसे खूबसूरत रिश्ता है तू
सुरेश रैनाने व्यक्त केल्या बहिणीबद्दलच्या आपल्या भावना
राजकारण न्यूज डॉट कॉम
नवी दिल्ली, 31- नुकताच रक्षाबंधनाचा पवित्र सण देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. यानंतर अनेकांनी हा सण साजरा केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण -भावाचे नाते किती अतुट आहे याचीच जणू माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू व मीष्टर आयपील म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना यानेही रक्षाबंधन साजरा केल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये बहिणीबद्दल भावना व्यक्त करताना सुरेश रैना म्हणतो की,
घर की खुशियों का एक हिस्सा है तू,
मेरी हर दुआ में शामिल एक किस्सा है तू।
राखी तो बस एक धागा है बहन,
मेरी ज़िंदगी का सबसे खूबसूरत रिश्ता है तू। ❤️🧿
#happyrakshabandhan❤️
यावेळी रैना आपल्या मोठ्या बहिणीच्या पाया पडत असल्याचेही दिसून येतो. त्याची ही पोस्ट दहा हजारहून अधिक चाहत्यांनी लाईक केली आहे. तर 184 चाहत्यांनी पुन्हा शेअर केली आहे. तर हजारहुन अधिक चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर आपल्या कमेंट केल्या आहेत.














Leave a Reply