राष्ट्रीय गोंदिया रनमध्ये गुंटूक मायलेकीचे यश 


0
Views

 

 

राष्ट्रीय गोंदिया रनमध्ये गुंटूक मायलेकीचे यश

सोलापूर, दि. 31-

मध्य प्रदेश मधील गोंदिया येथे फोर्स वन स्पोर्ट्स क्लब व करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षा हाफ मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय धावपटू श्रद्धा केशव गुंटूक हिने वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. श्रद्धा हिने 13 ते 18 वर्षे महिला वयोगटात 11 किमी अंतरमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर तिची आई वैशाली केशव गुंटूक यांनी 21 किमी अंतरमध्ये 41 ते 50 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेसाठी वैशाली गुंटूक या काही महिन्यांपासून आपल्या मुलांसोबत एस आर पी एफ कॅम्प व सोरेगाव येथे नित्यनियमाने सराव करत होत्या.

 

या विजेत्यांना मेजर कर्नल अजय सिंह यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या वेळी वातावरण अनुकूल होते पण थोड्या वेळाने पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक संजय तुपे, प्रियांका वैद्य, तसेच फोर्स वन स्पोर्ट्स क्लबच्या संचालिका नेहा कावळे, रत्ना कावळे, डॉ. अरुण कावळे, गोंदिया जिल्ह्य़ातील अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *