श्री स्वामीनारायण गुरुकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा


0
Views

 

श्री स्वामीनारायण गुरुकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजर

राजकारण न्यूज डॉट कॉम

सोलापूर, दि. 32-

कुंभारी येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुधीर धुळम हे होते. क्रीडा शिक्षक राजेश येमूल यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर धुळम यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिवसाचे महत्त्व पटवून दिले.

 

कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रमुखाचार्य पूज्य विश्व मंगलदासजी स्वामीजी व पूज्य नयनप्रियदासजी स्वामीजी यांचे आशीर्वाद लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक राजेश येमुल यांनी परिश्रम घेतले. व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन समन्वयक गणेश मादगुंडी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *