0
Views

वीरेंद्र सेहवाग बनला यमराज
नवी दिल्ली, दि. 16- टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. बुधवारी त्याने यमराज बनलेल्या वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. त्याचा हा लूक जाहिरातीसाठी करण्यात आला आहे किंवा अन्य कुठल्या कारणासाठी हे मात्र समजू शकलेले नाही.
सेहवागने सोशल मीडियावर आपली छायाचित्रे पोस्ट करत लिहिले की डेथ ओवर्स? बॅटिंग नही सीधा लाईफ का स्कोर कार्ड चेक करणे निकला हु. यासोबतच त्याने यमराज न्यू अवतार आधी हॅशटॅग ही वापरली आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स
गौरव पटेल या चाहत्याने पाजी अब कौन सी पीच पे खेलना है असे विचारले आहे. तर सुरज नेगी याने यमराजजी कोणत्या खेळाडूचा फॉर्म सध्या खराब आहे हे चेक करण्यासाठी आल्याचे म्हटले आहे. तर अर्जुन प्रजापती या चाहत्याने हा रावण आहे की यमराज असा प्रश्न सेहवागला विचारला आहे. सचिन मोरे या चाहत्याने एक बार फिरसे 300 सर, अशी कमेंट केली आहे. तर एका चाहत्याने त्याला कुंभकर्ण असेही संबोधले आहे.











Leave a Reply