खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना


0
Views

खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी

लाडक्या बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना

सोलापूर, दि. 14- गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर आज सोमवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आली. शिंदे परिवाराच्या उपस्थितीत श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा व आरती करण्यात आली.

 

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवरील संकटाचे सावट दूर व्हावे, जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक व दमदार पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे, पिकांना नवसंजीवनी मिळावी आणि बळीराजाच्या कष्टाला यश व समृद्धी लाभावी. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावे. प्रत्येकाच्या जीवनातील अडचणी दूर होऊन नव्या आशा, नव्या संधी आणि प्रगतीची नवी दारे खुली व्हावीत. बाप्पाचे आशीर्वाद आणि वडीलधाऱ्यांचे संस्कार सार्वजनिक जीवनात निरंतर जनसेवा करण्याचे आत्मिक बळ देत असतात. जनकल्याणाची आणि शाश्वत विकासाची ही वाटचाल श्री गणरायाच्या आशीर्वादाने अशीच अविरत सुरू राहावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *