0
Views

थकीत ऊस बिलासाठी शेतकरी चढले झाडावर
सोलापूर, दि. 7- ऊस पुरवठा शेतकरी संघटना गोकुळ थकीत ऊस बिल संघर्ष समिती, धारशिव, सोलापूर, लातूर येथील शेतकऱ्यांनी गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे आज सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. थकीत ऊसाची रक्कम मिळण्यासाठी शेतकरी अर्धनग्न होत झाडावर चढून बसले आहेत.
यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की गोकुळ साखर कारखाना लि. थोत्री, ता. दक्षिण सोलापूर यांनी सन २०२३-२०२४ व २०२४-२०२५ गेली तीन वर्षापासून ७० गावचे ऊसाचे बिल अद्याप पर्यंत न दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक चक्र बंद पडले आहे. चालू हंगाम २०२५-२०२६ मधील ५० कोटी रक्कम कारखान्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा केलेली आहे. पण मागील तीन वर्षाची २,५०,००,०००/- (दोन कोटी पन्नास लाख) देणी देण्यासाठी का टाळाटाळ करित आहेत. याच उत्तर अद्याप मिळाले नाही. मुळातच हत्ती गेला व शेपूट अडकले अशी अवस्था गोकुळ कारखान्याने शेतकऱ्याची करून टाकल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील आंदोलनावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी, प्रांत, दक्षिण सोलापूर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने १८ दिवसाचे ठिय्या आंदोलन स्थगित करुन ५० कोटी रक्कम दिली आहे.
तरी जिल्हाधिकारी व राज्यकर्त्यांनी याचा सहानुभूतीपूर्व व गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांची तीन वर्षापासून थकीत असलेले उसबिले तात्काळ अदा करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
















Leave a Reply