0
Views

ई-पिक पाहणीची नोंद अचूक व वेळेत होणे महत्त्वाचे
बाणेगाव येथे ई-पिक पाहणी कामकाजाची
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी
सोलापूर, दि. 1 – मौजे बाणेगाव येथे मंगळवारी ई-पिक पाहणी कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केली. सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची पडताळणी करून ई पीक पाहणीचे काम अत्यंत प्रभावीपणे करण्याबाबत निर्देशित केले. ई-पिक पाहणीची नोंद अचूक व वेळेत होणे महत्त्वाचे असल्याने महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी ई-पिक पाहणी प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांकडून पीक नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या तसेच आवश्यक मार्गदर्शन याबाबत माहिती घेण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, पीक पाहणी सहाय्यक, पोलीस पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते. पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-पिक पाहणीचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची नोंद करताना पिकांची माहिती अचूकपणे नोंदवावी आणि काही तांत्रिक अथवा अन्य अडचण उद्भवल्यास संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची अचूक माहिती शासनाच्या अभिलेखात उपलब्ध होण्यास मदत होते.
















Leave a Reply