जिल्हास्तरीय रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणी उत्साहात


0
Views

 

जिल्हास्तरीय रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धा

व राज्य निवड चाचणी उत्साहात

​सोलापूर, दि. 1-

रोल बॉल असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली १७ वर्षांखालील मुले व मुली जिल्हास्तरीय रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धा आणि राज्य निवड चाचणी स्पर्धा इंदिरा प्रशाला, शिंदे चौक, भागवत थिएटरसमोर सोलापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली.

 

या चाचणीतून कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या मुले-मुलींच्या संघांची निवड करण्यात आली आहे.​ सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पार पडलेल्या या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक क्रीडापटूंनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. १७ वर्षांखालील (१ जानेवारी २०१० नंतरचा जन्म असलेले) ६० खेळाडू या चाचणीत सहभागी झाले होते. स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट कौशल्य आणि चुरस पाहायला मिळाली. निवड समितीच्या वतीने खेळाडूंची गती, बॉल कंट्रोल आणि सांघिक कामगिरी लक्षात घेऊन अंतिम संघांची निवड करण्यात आली.

 

​या यशस्वी आयोजनाबाबत माहिती देताना रोल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ गुरव, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार आणि सचिव प्रमोद चुंगे यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतुक केले व निवड झालेल्या खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

​स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि संयोजन प्रमोद म्हेत्रे , शितल कुमार शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. याप्रसंगी स्थानिक क्रीडाप्रेमी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *