0
Views
देवदत्त पडिक्कल याचे शतक व कर्णधार शुभमन गिल याची अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी पहिल्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावात 85 षटकांत 5 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली आहे.
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब येथे सुरू झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताकडून देवदत्त पडिक्कलने 193 चेंडूत 12 चौकारांसह सर्वाधिक 117 धावांची खेळी केली. तर कर्णधार शुभमन गिल याने 108 चेंडूत 6 चौकारांसह 50, यशस्वी जयस्वालने 53 चेंडूत 9 चौकारांसह 45 व रवींद्र जडेजा याने 83 चेंडूत 4 चौकारांसह 43 धावांचे योगदान दिले. पडिक्कल आणि गिल यांनी तिसऱ्या जोडीसाठी 120 धावांची तर पडिक्कल आणि जडेजा यांनी पाचव्या जोडीसाठी 74 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. डावखुरा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत आगळावेगळा फटका मारण्याच्या प्रयत्नात हाताला चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त होत तंबूत परतला. रवींद्र जडेजाला चेंडू सोडून देण्याची चूक भोवली व तो दिवसाच्या अखेरीस त्रिफळाचीत झाला. श्रीलंकेकडून आजच्या दिवशी असिथा फर्नांडो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 46 धावांच्या मोबदल्यात भारताचे तीन फलंदाज बाद केले. खेळ थांबला त्यावेळी ध्रुव जुळेल 7 धावांवर तर भारताकडून पदार्पण करणारा एस जैन 4 धावांवर खेळत आहे.













Leave a Reply