कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता चषक जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन


0
Views
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे संचलित कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चॅम्प चेस स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मान्यतेने १५ वर्षाखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट रोजी जुळे सोलापूर येथील कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेत करण्यात आले आहे.
ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार एकूण पाच ते सात फेऱ्यांमध्ये संपन्न होणार आहे. खेळाडूंना प्रत्येकी १० मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. १५ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील प्रथम येणाऱ्या चार खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. ८ व ११ वर्षाखालील मुले व मुलींसाठी उत्तेजनार्थ पारितोषिके तसेच निवड झालेल्या खेळाडूंना प्रत्येकी ₹ १०००, आकर्षक चषक व मेडल्स अशी एकूण ४० बक्षिसे स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती वि. मो. मेहता माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष अनिल बरवे, नियामक मंडळ सदस्य सुरेशबाबु मंकणी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी व क्रीडा शिक्षक अमित कोर्टीकर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. २०० असुन इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे मो.क्र. ८८८८०४५३४४ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व सचिव आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड, संतोष पाटील, दिपाली पुजारी, दिनेश जाधव, युवराज पोगुल, गणेश मस्कले, रोहिणी तुम्मा आदींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *