खेळाडूंसाठी खुशखबर!! महिन्याला मिळणार तब्बल 40 ते 70 हजार रुपये 


0
Views

खेळाडूंसाठी खुशखबर!! महिन्याला मिळणार

तब्बल 40 ते 70 हजार रुपये 

ओएनजीसी क्रीडा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

सोलापूर, दि. 8 – ओएनजीसीकडून क्रीडा शिष्यवृत्ती योजना 2026 27 साठी तब्बल 19 क्रीडा प्रकारातील 125 पुरुष व महिला खेळाडूंना दर महिना 40 हजार ते 70 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

ओएनजीसीकडून ज्यांच्या पालकांची वार्षिक मिळकत 30 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा 18 ते 30 वर्ष वयोगटातील विजेतेपदाचे दावेदार श्रेणीतील 19 क्रीडा प्रकारातील खेळाडूंकडून हे अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक खेळाडूंनी ओएनजीसीच्या https://sports scholarship.ongc.co in या वेबसाईटवर 8 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 पासून ते 29 सप्टेंबर 2026 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी पोर्टलवर देण्यात आलेल्या योजनेचा तपशील आणि नियम व अटी वाचणे आवश्यक आहे. तसेच फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवाराने खोटे प्रमाणपत्र सादर केल्यास अर्ज नाकारण्यात येईल आणि संबंधित उमेदवाराविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार ओएनजीसीकडून राखीव ठेवण्यात आला असल्याचे ओएनजीसीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *