वोट चोर कहा मिलेंगे बी जे पी के दप्तर में 

वोट चोर कहा मिलेंगे बी जे पी के दप्तर में 

काँग्रेसची दिल्लीत महारॅली 

नवी दिल्ली, दि. 1-देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आयोजित ‘चलो दिल्ली’ रॅलीमध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी त्यांनी वोट चोर कहा मिलेंगे बी जे पी के दप्तर में यासह विविध घोषणा देऊन परिसर दणानून सोडला.

 

‘व्होट चोरी’च्या विरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी, निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित या आंदोलनात देशभरातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रामलीला मैदानावर जमलेला जनसागर हा केवळ गर्दीचा आकडा नव्हता, तर सत्तेच्या अहंकाराला दिलेला जनतेचा जाहीर इशारा होता. लोकशाही वाचवण्यासाठी, मतदारांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी देशभरातील जनता एकवटल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.

 

ना भीती, ना दबाव, ना झुकण्याची तयारी, अशा बुलंद निर्धाराने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. सत्तेच्या खुर्च्या कायमस्वरूपी नसतात; मात्र जनतेचा आवाज कधीही दाबता येत नाही, हा संदेश आज दिल्लीच्या रामलीला मैदानावरून संपूर्ण देशाला देण्यात आला.

 

लोकशाहीत अंतिम निर्णय सत्ताधाऱ्यांचा नसतो, तर तो जनतेचा असतो. जनतेची एकजूट हीच लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असून देशाला पारदर्शक निवडणुका, उत्तरदायी शासन आणि संविधानातील मूल्यांचे संरक्षण हवे आहे, हा ठाम निर्धार या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.

 

या आंदोलनात सोलापूर शहर जिल्ह्यातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुकाध्यक्ष प्रशांत शाळे, सुलेमान तांबोळी, पंढरपूर शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, प्रदेश सचिव राहुल वर्धा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, मध्य विधानसभा युवक अध्यक्ष वाहिद बिजापूरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, सागर उबाळे, अनंत म्हेत्रे, गजानन जक्किकोरे, एजाज बागवान, विवेक कन्ना, शिवशंकर अंजनालकर, सुभाष वाघमारे, पृथ्वीराज नरोटे, सचिन पवार, संस्कार नरोटे, कालिदास काळपगार, व्यंकटेश बोमन, मोतीराम चव्हाण, रावसाहेब व्हनमाने, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, योगेश रणधीरे, शशिकांत शेळके, आकाश नाईक, पीयूष इंगळे, सिद्धेश्वर न्यामगौडा, संदीप मोरे, सुनील डोळसे, श्रीनिवास परकीपंडला, शंकर गायकवाड, मल्हारी फाळके यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *