
परमेश्वर पिंपरी येथे खासदार प्रणिती शिंदे यांचा जनसंवाद
मोहोळ, दि. 30- मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी जनसंवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी गावातील विविध प्रलंबित प्रश्न आणि समस्या मांडल्या.
यामध्ये कॅनलला पाणी सोडून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, गावातील रस्त्यांची दुरुस्ती व विकास करणे तसेच वनविभागाच्या हद्दीत असलेली घरे संबंधित नागरिकांच्या नावावर करून देणे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी, शेतीविषयक समस्या आणि गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न जाणून घेतले. काही समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रयत्न केले, तर उर्वरित प्रश्नांवर संबंधित विभागांशी पाठपुरावा करून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. गावकऱ्यांच्या समस्या सोडवून परमेश्वर पिंपरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या जनसंवादावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, तायप्पा पुजारी, द्रौपदी पुजारी, रामभाऊ दुधाळ, अण्णा बंडगर, दाजी वाघमोडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Reply