
मत वाचवा–देश वाचवा अभियानांतर्गत
सोलापूर शहरात काँग्रेसची रॅली
सोलापूर, दि. १६ – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा–देश वाचवा’ अभियानांतर्गत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील अनियमितता, मतचोरी आणि लोकशाहीवरील आघातांविरोधात काँग्रेसने आवाज बुलंद केला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला मतचोरीविरोधातील लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. महाराष्ट्र, हरियाणासह विविध राज्यांतील मतदार याद्यांमध्ये फेरफार भाजपने केला आहे. मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या फायद्यासाठी मनमानी पद्धतीने फॉर्म ०६ मध्ये बदल केला. SIR च्या माध्यमातून १३ कोटी पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपने केले आहे.
मतदार यादीतील नाव वगळले गेल्यास सामान्य नागरिकांना स्वतःचे नागरिकत्व आणि मतदानाचा हक्क सिद्ध करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा असून, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, भाजपकडून आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला गेला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करणे आणि त्यांच्यावर बळाचा वापर करणे, ही लोकशाही मूल्यांना धरून असलेली कृती नाही. ब्रिटिशांच्या काळात तिरंगा फडकविणाऱ्यांनी संघर्ष केला आणि आजही तिरंगा फडकवून लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठविणाऱ्यांना अटक होत असेल, तर ही गंभीर बाब आहे. भाजपने संविधान कधीच मानले नाही. संविधान बदलण्याची घोषणा करते, तिरंग्याचा सन्मान राखला नाही. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने कित्येक दशके आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकाविला नाही. अशी विचारसरणी आम्ही नव्हे या देशावर प्रेम करणारा कोणीही या देशात चालू देणार नाही. ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशात अघोषित आणीबाणी परिस्थिती निर्माण झाली असून, ती काँग्रेस पक्षासह देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत म्हणजे चेष्टा : खासदार प्रणिती शिंदे
‘मत वाचवा–देश वाचवा’ अभियानातील रॅलीदरम्यान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या अपुऱ्या आर्थिक मदतीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना खतांचे दर, इतर शेती निविष्ठांचा खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार अधिकच वाढला आहे. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी असून, ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका त्यांनी केली. दुष्काळग्रस्त भागांत अद्याप पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, जनावरांसाठी चारा छावण्यांची पुरेशी व्यवस्था नाही आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजनही नाही, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होत असताना सरकार नेमके काय करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांवर लाखो कोटींचे टेंडर काढण्यापेक्षा तो निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना का दिली जात नाही, शेतकऱ्यांचा वापर करून सत्तेवर आलेल्या भाजप महायुती सरकारने आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरघोस आर्थिक मदत जाहीर करून प्रत्यक्ष लाभ द्यावा, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.
भाजप पाधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना धमकावण्याऐवजी नियमित पाणी द्यावे
सोलापूर शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि महानगरपालिका प्रशासनावर टीका केली. विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याची आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना सहा ते सात दिवसांनी पाणी मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे त्या म्हणाल्या.
सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना प्रत्यक्षात पाण्याचे योग्य नियोजन करता आलेले नाही. उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाण्याचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे समोर येत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,
नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे ही प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याऐवजी नागरिकांना धमकावण्याची भाषा करणे योग्य नाही. पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. मात्र, सत्ताधारी भाजप आश्वासने देण्यात आणि टेंडर प्रक्रियेतील टक्केवारी व भ्रष्टाचारामध्ये व्यस्त असून सोलापूर महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे केंद्र बनविले आहे. असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना धमक्या देण्याऐवजी त्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा, अन्यथा आगामी काळात जनता सत्ताधारी भाजपला जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
यावेळी चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, सुशीला आबुटे, बाबा मिस्त्री, प्रा. नरसिंह आसादे, प्रा. अशोक निंबर्गी, राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, जुबेरभाई कुरेशी, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, सागर उबाळे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम, युवराज जाधव, रुपेश गायकवाड, विवेक खन्ना, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, सुभाष वाघमारे, ॲड. करीमुन्निसा बागवान, सायमान गट्टू, प्रा. भोजराज पवार, हरुण शेख, रमेश कैरमकोंडा, उदयशंकर चाकोते, देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, शिवशंकर आंजनाळकर, परशुराम सतारेवाले, भरत जाधव, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, ॲड. केशव इंगळे, अनिल मस्के, गणेश आप्पा नरोटे, गिरीधर थोरात, अशोक कलशेट्टी, शोएब महागामी, सैफन शेख, इलियास शेख, रमेश फुले, लखन गायकवाड, नागेश म्याकल, संजय गायकवाड, पृथ्वीराज नरोटे, संस्कार नरोटे, भीमराव शिंदे, मोहसीन फुलारी, हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, पूजा चव्हाण, अनिता भालेराव, धनलक्ष्मी देशमाने, शकुंतला राऊत, इन्नुबाई गायकवाड, राजेश झंपले, नूरअहमद नलवार, ऐजाज बागवान, धोंडप्पा तोरणंगी, हेमंत जाधव, दशरथ सामल, प्रवीण जाधव, दाऊद नदाफ, सचिन पवार, नागेश म्याकाल, वसीम महागामी, धीरज खंदारे, शशिकांत शेळके, महेंद्र शिंदे, व्यंकटेश बोमेन, प्रतीक शिंगे, सिद्राम आनंद, जितराज गरड, आकाश जांभळे, शुभम ऐक्कलदेवी, शिवाजी साळुंखे, आप्पा सलगर, आबा मिटकरी, राजेश झंपले, चंद्रकांत टिक्के, हणमंतु रुपनर, काशिनाथ शिरशीकर, दत्तात्रय पांढरे, बाबा शेख, ॲड. लक्ष्मण बनसोडे, शुकुर शेख, अभिलाष अच्युगटला, पवन सग्गम, रफिक रामपुरे, संतोष उबाळे, शाम होवळे, दशरथ तळवार, आयन नडिवले, सचिन सुरवसे, नागनाथ जक्कन, इब्राहिम कलबुर्गी, नारायण कांबळे आदी उपस्थित होते.















Leave a Reply