0
Views

विडी उद्योग टिकविण्यासाठी प्रयत्न करणार
आमदार विजय देशमुख यांची ग्वाही
सोलापूर, दि. 18- शहरातील विडी उद्योग टिकवून कामगारांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सोलापूर शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांनी दिली.
सोलापूर शहरातील विडी कारखाने बंद होऊ नये व कामगारांची रोजीरोटी देखील बुडु नये यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे प्रयत्न करावेत या मागणीचे निवेदन विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने आमदार देशमुख यांना दिले. यावेळी ते बोलत होते.
निवेदनात म्हंटले आहे की विडी कामगारांना किमान वेतन ३ ऑगस्ट रोजी कामगार मंत्री, आकाश फुंडकर यांनी जाहीर केले. त्यानंतर विडी कारखानदारांना हे मजुरी देणे परवडत नाही यासाठी आम्ही विडी कारखाने बंद करुन इतर राज्यात हलवु अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाने बंद करु नये यासाठी प्रयत्न करुन विडी कारखाने बंद करण्यापासून परावृत्त केले. परंतु त्यानंतर देखील विडी कारखाने वाढ मजूरी देणे आम्हाला परवडत नाही. यामुळे कारखाने बंद होऊ शकतात असे सांगत असल्यामुळे विडी कामगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वास्तविक पाहता हिच परिस्थिती आपण स्वतः कामगार मंत्री असताना सन २०१८ साली देखील निर्माण झाली होती. त्यावेळी आपण स्वतः सोलापूरातील परिस्थिती पाहून उद्योग वाचविण्याचा दृष्टीकोन ठेवुन त्रिपक्षीय समिती गठीत करुन विडी उद्योग वाचवुन विडी कामगारांना काम मिळवून दिले होते. आता देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाईच्या दृष्टीने किमान वेतन जाहीर झाले. परंतू विडी कारखानदारांना तेव्हढी मजुरी देणे परवडत नाही. ही भूमिका घेऊन कारखानदारांनी कारखाने बंद करू अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. म्हणून यातून तोडगा काढण्यासाठी आमदार देशमुख यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली.
मागील त्रिपक्षीय समितीस पुढील कार्यकाल वाढवून मिळावा. तसेच आत्ता उद्भविलेल्या परिस्थितीचा विचार करुन विडी उद्योग वाचविण्यासाठी व कामगारांना न्याय मिळण्यासाठी त्वरीत बैठक आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे व कामगाराचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आ. विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिले.
यावेळी डॉ. गोवर्धन सुंचू , विष्णु कारामपुरी, सायब्बांना तेग्गेली, राहुल गुजर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा आदि उपस्थित होते.















Leave a Reply