0
Views

हजारो कोटींची संपत्ती असलेला आमदार का बनला भिकारी?
मुंबई, दि. 14- तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांची संपत्ती असूनही एखादा सत्ताधारी पक्षाचा आमदार भिकारी बनून आपल्याच मतदारसंघात भीक मागत असेल तर कोणाला खरे वाटेल का? होय पण ही सत्य घटना घडली आहे मुंबईतील घाटकोपर येथे. इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा आमदार का भिकारी बनला हे जाणून घेऊया या बातमीतून
पराग शाह असे भिकारी बनलेल्या या भाजपच्या आमदाराचे नाव आहे. ते पूर्व घाटकोपर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. सध्या जैन धर्मीयांचे चातुर्मास सुरू आहे. आमदार पराग शाह यांच्या गुरुंनी म्हणजेच श्री नम्र मुनी महाराज यांनी त्यांना आज्ञा केली होती की पराग शाह यांनी आपल्याच मतदार संघामध्ये एक दिवस भिकारी म्हणून सर्वत्र फिरावे. त्याचा अनुभव घ्यावा व नंतर सर्वांपुढे कथन करावा. या मागचे कारण म्हणजे गरिबी आणि माणुसकी याकडे आपण कसे बघतो याचा दृष्टिकोन आपल्याला मिळावा तसेच एक दिवस आपली ओळख, पद, अहंकार बाजूला ठेवून आपण पाहिले पाहिजे. यानंतर आमदार शाह यांनी आपल्या गुरूंचा आदेश मानत वेशांतर करून आपल्याच मतदारसंघात एक दिवस भीक मागितली. यादरम्यान कोणीही त्यांना ओळखले नाही. काही लोकांनी त्यांना भीक म्हणून पैसे दिले तर कोणी त्यांना भुकेले समजून अन्नदान केले. तर काही लोकांनी त्यांना पाहून दूर जाणे पसंत केले. तसेच काही लोकांनी त्यांना हुसकावून देखील लावले. संपूर्ण एक दिवस हा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच लोकांची भेट घेऊन आपण काल भिकाऱ्याच्या वेशात भेटलो होतो असे सांगताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या माध्यमातून आपल्याला गरिबी आणि माणुसकी याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेला हा प्रयोग सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या प्रयोगावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी यापासून बोध घेत हा प्रयोग करण्याचा टोला लगावला आहे.
आमदारांकडे इतकी संपत्ती कशी?
आमदार पराग शाह यांच्याकडे इतकी संपत्ती कशी हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. मात्र आमदार पराग शाह हे रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मोठमोठे प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत. त्यांची संपत्ती ही केवळ महाराष्ट्रातच नसून गुजरात आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यातही असल्याचे समोर आले आहे.















Leave a Reply