0
Views

कोहलीने लंडनमध्ये घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई, दि. 12- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लंडन दौऱ्यावर गेले असता तिथे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने त्यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी कोहलीचे शाल घालून आणि बुके देऊन स्वागत केले. या अनपेक्षित भेटीबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की विराट कोहली लंडनमध्ये राहतो. मी लंडनमध्ये असल्याचे समजल्यानंतर तो मला भेटायला आला. एवढा मोठा भारतीय क्रिकेटपटू, सर्वाधिक शतके करणारा खेळाडू असूनही तो किती साधा आहे, हे पाहून मला आनंद झाला. दरम्यान शिंदे आणि कोहली यांच्यातील भेटीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
दरम्यान आपल्या लंडन दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानी देखील भेट दिली. तसेच लंडनच्या रस्त्यावर स्ट्रीट वडापाव खाण्याचा देखील आनंद घेतला.













Leave a Reply